यवतमाळ - जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्युमध्ये दोन जणांची भर पडल्याने आतापर्यंत एकूण मृत्युची संख्या 34 झाली आहे. तर जिल्ह्यात 56 नवीन पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली. आयसोलेशन वॉर्ड आणि विविध कोविड केअर सेंटरमध्ये भरती असलेले 80 जण उपचारानंतर बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.
यवतमाळमध्ये दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू; तर 56 नव्या रुग्णांची भर
मंगळवारी मृत झालेल्या दोन जणांमध्ये यवतमाळ शहरातील पाटीपुरा येथील 65 वर्षीय महिला आणि दिग्रस तालुक्यातील फुलवाडी येथील 55 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. आज पॉझेटिव्ह आलेल्यांमध्ये पुसद शहरातील महावीर वॉर्ड येथील एक पुरुष यांचा समावेश आहे.
मंगळवारी मृत झालेल्या दोन जणांमध्ये यवतमाळ शहरातील पाटीपुरा येथील 65 वर्षीय महिला आणि दिग्रस तालुक्यातील फुलवाडी येथील 55 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. आज पॉझेटिव्ह आलेल्यांमध्ये पुसद शहरातील महावीर वॉर्ड येथील एक पुरुष, पुसद शहरातील तीन पुरुष व पुसद ग्रामीण मधील एक पुरूष, दिग्रस शहरातील श्रीरामपूर येथील एक पुरूष, दिग्रस शहरातील पाच महिला व 13 पुरुष, पांढरकवडा शहरातील एक पुरूष व एक महिला, यवतमाळ शहरातील आंबेडकर चौक येथील एक पुरुष, काळे लेआऊट येथील एक पुरूष, कमला पार्क येथील एक पुरूष व एक महिला, संभाजीनगर येथील एक महिला, दर्डा नगर येथील एक पुरूष, उमरखेड शहरातील चार पुरुष व 13 महिला, आर्णी शहरातील तीन पुरुष व दोन महिला, नेर शहरातील एक पुरुष व एक महिला पॉझिटिव्ह आले आहेत.
जिल्ह्यात सोमवारपर्यंत 464 ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह रुग्ण होते. यात आज नव्याने 58 पॉझेटिव्ह रुग्णांची भर पडली. त्यामुळे हा आकडा 522 वर पोहचला. मात्र दोन जणांचा मृत्यु आणि ‘पॉझेटिव्ह टू निगेटिव्ह’ झालेल्या 80 जणांना सुट्टी झाल्यामुळे सद्यस्थितीत जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 440 झाली आहे. जिल्ह्यात सुरवातीपासून आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 1284 झाली आहे. यापैकी 810 जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात 34 मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात 130 जण भरती आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने मंगळवारी 368 नमुने तपासणीकरीता पाठविले.