महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पोहण्याचा अतिउत्साह बेतला तरुणांच्या जीवावर, दोघांचा बुडून मृत्यू - दिग्रस तरुण मृत्यू न्यूज

पावसाळ्यात लहान-मोठे नाले आणि धरणांमध्ये पाणीसाठा जमा होतो. अशा ठिकाणी नागरिक पोहण्यासाठी जातात. मात्र, अनेक वेळा पाण्याचा आणि गाळाचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू झाल्याच्या घटना होतात. यवतमाळच्या दिग्रस तालुक्यामध्येही अशाच दोन घटना घडल्या.

Drowning
बुडून मृत्यू

By

Published : Sep 15, 2020, 1:59 PM IST

यवतमाळ - धरणामध्ये पोहण्यासाठी गेलेल्या दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाला. सोमवारी सायंकाळी दिग्रस तालुक्यात या दोन्ही घटना घडल्या. मनीष अनिल राठोड आणि दिनेश प्रकाश भेंडे अशी या तरुणांची नावे आहेत.

नांदगव्हाण आणि अरुणावती धरणामध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू

काही दिवसांपासून जिल्ह्यात समाधानकारक पाऊस होत आहे. त्यामुळे दिग्रस शहरापासून जवळच असलेले नांदगव्हाण धरण पूर्णपणे भरले आहे. त्यामुळे नांदगव्हाण धरणाला पर्यटनस्थळाचे स्वरूप आले आहे. दिग्रस येथील पाच तरुण नांदगव्हाण धरणात पोहण्याचा प्रयत्न करत होते. पोहताना पाण्याच्या खोलीचा अंदाज न लागल्याने मनीष अनिल राठोड हा बुडाला.

अरुणावती प्रकल्पदेखील ९९ टक्के भरल्याने धरणाचे तीन दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे धरणाचे पाणी बघण्यासाठी नागरिक गर्दी करत आहेत. धरणाच्या दरवाज्या समोरील टाक्यात पोहण्याच्या उद्देशाने उडी मारणारा चिरकुटा येथील तरुण दिनेश प्रकाश भेंडे हा बुडाला. बुडालेल्या या तरुणांचा शोध सुरू आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details