यवतमाळ :यवतमाळ तालुक्याअंतर्गत येणाऱ्या वंसतपूर-बोरी गोसावी येथील शेत शिवारात दोन मुलांचा अल्पवयीन मुलांचा विद्युत धक्क्यामुळे जागीच मृत्यू झाल्याची घटना दुपारच्या सुमारास घडली. विक्की जनार्दन राठोड (15), सुरज भोपीदास राठोड (15) दोघेही रा. वसंतरनगर (बोरी गोसावी) अशी मृत्यू झालेल्या मुलांची नावे आहेत.
खत देण्यासाठी गेलेल्या दोन मुलांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, बोरी गोसावीतील घटना - two boys died in farm yavatmal news
शेतात खत देण्यासाठी गेलेल्या दोन अलपवयीन मुलांचा कुंपणातील ताराला असलेल्या विद्युत कुंपणाला असलेल्या विद्युत प्रवाहाचा जबरदस्त झटका बसल्याने जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना वंसतपूर- बोरी गोसावी येथील शेत शिवारात घडली.
माया लखन राठोड यांच्या शेतात ही दोन्ही मुले खत देण्यासाठी गेली होती. अशात जंगली जनावरांपासून शेत मालाचे रक्षण करण्यासाठी अवैधरित्या वीज चोरी करून तार कुंपणाला विद्युत प्रवाह सोडण्यात आला होता. शेतात खत देण्यासाठी गेलेल्या विक्की आणि सुरज यांना तार कुंपणाला असलेल्या विद्युत प्रवाहाचा जबरदस्त झटका बसल्याने ते दोघेही जागीच ठार झाले. या घटनेनंतर लगेच आर्णी महावितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता नरेंद्र राऊत, यवतमाळ ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. या गंभीर घटनेमुळे शेत मालकांवर गुन्हे दाखल होणार हे जवळपास निश्चित झाले आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा -पंधरा मिनिटांच्या वादळी पावसाने शेतकरी उद्ध्वस्त; नेर तालुक्यातील चार ते पाच गावांना फटका