यवतमाळ -जिल्ह्यातील पांढरकवडा, वणी आणि घाटंजी या तीन तालुक्याला गारपिटीसह अवकाळी पावसाने झोडपून काढले. यात रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सततच्या पावसामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे. मागील आठवड्यातपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. सायंकाळच्या सुमारास पांढरकवडा तालुक्यातील खैरगाव, लिंगटी, मोरवा, उमरी, सायखेडा, तेलंग टाकळी, किन्ही, किनाला, वागदा तर घाटंजी तालुक्यातील राजूरवाडी आणि वणी तालुक्यातील गणेशपूर, या गावांना पावसाने अक्षरशः झोडपून काढले.
यवतमाळमध्ये अवकाळी पावसासह गारपीट, तीन तालुक्यांना बसला मोठा फटका - Yavatmal Rain news
जिल्ह्यातील पांढरकवडा वणी आणि घाटंजी या तीन तालुक्याला गारपिटीसह अवकाळी पावसाने झोडपून काढले. या अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले
तीन तालुक्यातील बारा गावांना गारपीटीचा फटका
या भागात प्रचंड गारपीट झाली. ही गारपीट जवळ पास 4 ते 5 मिनिटं सुरूच होती. काही ठिकाणी तर बोरा एवढी गार पडली. शेतात गारीचा अक्षरशः सडा पडला होता. यामुळे गहू, हरबरा, भाजीपाला, फळबाग, कापूस, तूर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अवकाळी पाऊस आणि गारपीटमुळे शेतकरी पुरता खचून गेला आहे. मुसळधार कोसळणाऱ्या या पावसाने जण जीवन विस्कळीत झाले आहे.
हेही वाचा : सत्तर वर्षीय शेतकऱ्याची यशोगाथा; आंतरपिकातून शोधला समृद्धीचा मार्ग
Last Updated : Jan 9, 2020, 2:06 AM IST