यवतमाळ- मेळघाट व्याघ्र प्रकल्प येथील उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार यांच्या त्रासाला कंटाळून वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांनी आत्महत्या केली. त्यामुळे उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार यांना सेवेतून बडतर्फ करा, अशी मागणी वन विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी केली आहे. 5 एप्रिल पर्यंत बडतर्फ केले नाही तर, काम बंद आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे. तसेच यावेळी फॉरेस्ट रेंजर असोसिएशन, वनपाल वनरक्षक संघटना, कास्ट्राईब संघटना, महाराष्ट्र स्टेट गॅझेटेड फॉरेस्ट संघटना यांच्यावतीने मुख्य वनसंरक्षक यांना निदर्शने करत निवेदन देण्यात आले आहे.
उपवनसंरक्षक विनोद शिवकुमारला बडतर्फ करा; वन विभागाच्या कर्मचाऱ्यांची मागणी - वन विभागाच्या कर्मचाऱ्यांची मागणी
नियंत्रण अधिकारी रेड्डी यांना तत्काळ अटक करून बडतर्फ करण्यात यावे. शिवाय उच्चस्तरीय चौकशी समिती गठित करण्यात यावी, प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या ज्यांचा सहभाग आहे, त्यांच्यावर गुन्हे नोंदवून कारवाई करण्यात यावी.अशी मागणी या संघटनांनी केली आहे.
वन कर्मचारी आंदोलन