यवतमाळ: एका गुन्ह्यात आरोपी असलेल्या तरुणाने हातात विषाची बाटली घेत तो टॉवरवर चढला. Yavatmal Crime एवढेच नव्हे, तर येथील अवधूतवाडी ठाण्यातील Avadhutwadi Police Station पोलीस अधिकारी police officer असलेल्या दाम्पत्यावर धमकी दिल्याचा आरोप करत त्याने विष प्राशनाचा प्रयत्न केला आहे. ही गंभीर घटना आज रविवारी दुपारी 4.30 वाजताच्या सुमारास पांढरकवडा येथील सुराणा जिनिंग परिसरातील वीज वितरण कार्यालयाच्या आवारात घडली.
Yavatmal Crime: टॉवरवर चढून तरुणाचा विष प्राशनचा प्रयत्न - तरुणाचा विष प्राशनचा प्रयत्न
Yavatmal Crime: एका गुन्ह्यात आरोपी असलेल्या तरुणाने हातात विषाची बाटली घेत तो टॉवरवर चढला. Yavatmal Crime एवढेच नव्हे, तर येथील अवधूतवाडी ठाण्यातील Avadhutwadi Police Station पोलीस अधिकारी police officer असलेल्या दाम्पत्यावर धमकी दिल्याचा आरोप करत त्याने विष प्राशनाचा प्रयत्न केला आहे. ही गंभीर घटना आज रविवारी दुपारी 4.30 वाजताच्या सुमारास पांढरकवडा येथील सुराणा जिनिंग परिसरातील वीज वितरण कार्यालयाच्या आवारात घडली.
या घटनेने प्रशासनाची चांगलीच भंबेरी उडाली पांडुरंग श्रीकृष्ण मुतनेनवार (32) रा. सिंधी कॉलनी पांढरकवडा असे टॉवरवर चढून विष प्राशनाचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. काही दिवसांपूर्वी एका तरुणीची छेड काढल्याप्रकरणी नागरिकांनी त्याला चोप दिला होता. तसेच पीडित तरुणीच्या तक्रारीवरून त्याच्याविरुद्घ विनयभंगाचा गुन्हा येथील अवधूतवाडी पोलिसात दाखल झाला होता. तपासादरम्यान त्याला अटकही करण्यात आली होती.
पोलिसांचे पथक दाखलदरम्यान, तपासअधिकारी महिला आणि तिच्या पतीने खोट्या गुन्ह्यात गोवण्याची धमकी दिल्याने हा प्रकार केल्याचे त्याने यावेळी बोलताना सांगितले आहे. पांडुरंग टॉवरवर चढल्याचे समजताच पांढरकवडा पोलिसांचे पथक दाखल झाले होते. दरम्यान त्याची प्रशासनाकडून मनधरणी सुरू होती. मात्र, त्याला टॉवरवरून उतरविण्यात यश आले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.