यवतमाळ- यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात येत्या २३ तारखेला सकाळी ८ वाजतापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. शहरातील दारव्हा मार्गावरील शासकीय गोदामात ही मतमोजणी होणार आहे. या परिसरात तिहेरी सुरक्षा पाळण्यात येणार आहे.
मतमोजणी केंद्राच्या सुरक्षेबद्दल माहिती देताना जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार मतमोजणी सुरू असलेल्या प्रत्यक्ष खोलीमध्ये राष्ट्रीय सशस्त्र दलाचे जवान तैनात राहणार आहेत. त्यानंतर त्या बाहेरच्या परिसरात राज्य सशस्त्र दलाचे जवान तैनात राहणार आहेत. त्यानंतर प्रवेशद्वारावर आणि या परिसराच्या बाहेरच्या सर्व बाजुला जिल्हा पोलीस दलाचे कर्मचारी तैनात राहणार आहेत.
उमेदवारांच्या ४२५ प्रतिनिधींची नोंदणी -
मतमोजणी चालणाऱ्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक टेबलवर ठेवण्यासाठी १ याप्रमाणे ८८ मतमोजणी प्रतिनिधी नेमण्याची मुभा लोकसभा निवडणुकीतील प्रत्येक उमेदवाराला देण्यात आली होती. मात्र, सर्व उमेदवारांकडून मिळून सध्या ४२५ मतमोजणी प्रतिनिधींची नावे प्राप्त झाली आहेत. त्यामुळे हे मतमोजणी प्रतिनिधी मतमोजणी दरम्यान उपस्थित राहणार आहेत. या सर्व प्रतिनिधींना ओळखपत्र देण्यात आली आहेत. कुठलीही व्यक्ती मतमोजणीच्या ठिकाणी ओळखपत्राविना आत जाऊ शकणार असल्याचे यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी सांगितले.
मतमोजणी केंद्राच्या बाहेर अनुचीत प्रकार घडू नये. यासाठी मतमोजणी केंद्रासमोर असलेला दारव्हा मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. त्यासाठी लाठीवाला पेट्रोल पंप आणि दारव्हा नाका या दोन ठिकाणी रस्ता बंद करून वाहतूक रोखण्यात येणार आहे.