यवतमाळ- दरवर्षी 5 जून हा दिवस ‘जागतिक पर्यावरण दिन’ म्हणून साजरा केला जातो. पर्यावरण संरक्षणासाठी जागतिक पर्यावरण दिवस साजरा करतात. अशातच वर-वधूने आपले सामाजिक कर्तव्य पार पाडत लग्न सोहळ्यादरम्यान वृक्षारोपण करून जागतिक पर्यावरण दिवस साजरा केला.
यवतमाळमध्ये नववधू-वराने वृक्षारोपन करून साजरा केला 'जागतिक पर्यावरण दिन'
या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त बेस्ट फाउंडेशनने ज्ञानेश्वर व सुप्रिया या नववर-वधुकडून वृक्षारोपण करुण घेतले.
वाशिम येथील ज्ञानेश्वर भालेराव व पुसदच्या सुप्रिया गायकवाड यांचा आज पुसद येथे विवाह सोहळा पार पडला. या समारंभाला बेस्ट फाउंडेशन औरंगाबाद येथील कविता रगडे व राकेश रगडे उपस्थित होते. बेस्ट फाउंडेशन नेहमी स्व-खर्चाने पर्यावरण पूरक उपक्रम राबवित असते. या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त बेस्ट फाउंडेशनने ज्ञानेश्वर व सुप्रिया या नववर वधुकडून वृक्षारोपण करुण घेतले. आजपासुन प्रत्येक नववधु-वराने लग्न सोहळ्यादरम्यान मंगल कार्यालयाजवळ एक झाड लावावे व त्याचे संवर्धन करावे, असे आवाहन कविता रगडे यांनी केले. सामाजिक बांधीलकी जोपासत केलेल्या वृक्षारोपण कार्यक्रमाचा आनंद नववर वधुंच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता.