महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

यवतमाळमध्ये अतिरिक्त कोविड भत्त्याच्या मागणीसाठी प्रशिक्षणार्थी डॉक्टरांचे आंंदोलन - प्रशिक्षणार्थी डॉक्टरांचे आंदोलन

यवतमाळ व इतर जिल्ह्यात हाच कोविड भत्ता कमी देण्यात येत आहे. त्यामुळे प्रशिक्षणार्थी डॉक्टरांना 50 हजार रुपये भत्ता देण्यात यावा, या मागणीसाठी आज (गुरुवार) जिल्हा शासकीय वैद्यकीय रुग्णालयात 2016 मधील एमबीबीएस पदवी पास झालेल्या प्रशिक्षणार्थी डॉक्टरांनी आंदोलन केले आहे.

प्रशिक्षणार्थी डॉक्टरांचे आंदोलन
प्रशिक्षणार्थी डॉक्टरांचे आंदोलन

By

Published : May 6, 2021, 7:13 PM IST

यवतमाळ - मुंबई आणि पुणे याठिकाणी प्रशिक्षणार्थी डॉक्टरांना कोविड भत्ता 50 हजार रुपये देण्यात येत आहे. मात्र, यवतमाळ व इतर जिल्ह्यात हाच कोविड भत्ता कमी देण्यात येत आहे. त्यामुळे प्रशिक्षणार्थी डॉक्टरांना 50 हजार रुपये भत्ता देण्यात यावा, या मागणीसाठी आज (गुरुवार) जिल्हा शासकीय वैद्यकीय रुग्णालयात 2016 मधील एमबीबीएस पदवी पास झालेल्या प्रशिक्षणार्थी डॉक्टरांनी आंदोलन केले आहे. यावेळी आपल्या मागण्यांचे निवेदन अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे यांना देण्यात आले आहे.

कोविड भत्त्याच्या मागणीसाठी प्रशिक्षणार्थी डॉक्टरांचे आंंदोलन
'..तर रुजू होणार नाही'

इतर आरोग्य सेवकांना वीमा देण्यात येते तेच सुरक्षाकवच आम्हा डॉक्टरांना देण्यात यावे, डॉक्टरांना मास्क, पीपीई कीट हे साहित्य प्रशासनाकडून पुरविण्यात यावे, कोरोना काळामध्ये उपचार करत असताना एखादा डॉक्टर जर बाधित झाला, तर त्याच्या विलगीकरणाची आणि उपचाराची व्यवस्था प्रशासनाने करावी, या मागण्या मान्य झाले तरच कामावर रुजू होऊ, असा इशाराही यावेळी या प्रशिक्षणार्थी डॉक्टरांनी दिला आहे.

हेही वाचा -मुंबई : नेस्कोत उभारले जाणार देशातील पहिले स्वतंत्र पीडियाट्रीक कोविड सेंटर

ABOUT THE AUTHOR

...view details