यवतमाळ - घाटंजी तालुक्यातील भांबोरा गावात कोरोनाचे नऊ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे कोणीही गावाबाहेर जाऊ नका, असे आवाहन दवंडीच्या माध्यमातून कऱण्यात आहे. तसेच सध्या गावचा रस्ता देखील बंद स्थानिकांनी बंद केलाय. गावाबाहेर न पडण्याचे आवाहन दवंडीमार्फत करण्यात येत आहे. कोणत्याही पाहुण्यांन बोलवण्याचे देखील सांगण्यात येत आहे.
ऐका हो ऐका...नऊ पॉझिटिव्ह असलेल्या भांबोरा येथे दवंडीतून जनजागृती! - yavatmal covid updates
घाटंजी तालुक्यातील भांबोरा गावात कोरोनाचे नऊ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे कोणीही गावाबाहेर जाऊ नका, असे आवाहन दवंडीच्या माध्यमातून कऱण्यात आहे.
ऐका हो ऐका...नऊ पॉझिटिव्ह असलेल्या भांबोरा येथे दवंडीतून जनजागृती!
नऊ पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये पाच महिला आणि चार पुरुषांचा समावेश आहे. बाधितांवर सध्या रुग्णावर उपचार सुरू आहेत. घाटंजी तालुक्यात कोरोनाच्या दहशतीमुळे जनतेत भीतीचे वातावरण आहे.
आतापर्यंत घाटंजी तालुका कोरोनामुक्त होता. मात्र, गुजरात वरून आलेल्या काही पाहुण्यांमुळे भांबोरा गाव कोरोनाग्रस्त झाले. सुरक्षिततेसाठी संपूर्ण गाव सील करण्यात आले कडक लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. बाधितांच्या संपर्कात आलेल्यांना ट्रेस करण्यात येत आहे.