यवतमाळ -शहरात कोरोनाने थैमान घातल्याने यंत्रणा अलर्ट झाली आहे. परिणामी यवतमाळ तहसीलदारांनी कोरोनाला रोखण्यासाठी तपासणीचे वैद्यकीय प्रमाणपत्र असेल तरच दुकाने उघडता येणार अन्यथा बंद ठेवावे लागेल, अशी सूचना व्यापाऱ्यांना केल्या होत्या. त्या अनुषंगाने तहसीलदार, नगरपरिषद तसेच पोलीस कर्मचारी यांच्या संयुक्त पथकाने शहरात कोविड चाचणीचे प्रमाणपत्र नसणाऱ्या व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली.
यवतमाळ; कोविड चाचणी न करणाऱ्या व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाई - यवतमाळ कोरोना न्यूज
यवतमाळ शहरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोनाबाधितांच्या संख्येसोबतच मृत्यू दराचा आलेख वाढता असल्याने जिल्हाधिकारी यांनी शहरातील संपूर्ण व्यापाऱ्याची कोरोना चाचणी करण्याचे निर्देश यंत्रणेला दिले.
कोविड चाचणी
Last Updated : Mar 27, 2021, 7:16 PM IST