यवतमाळ -राज्यात वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे प्रशासनाकडून मिनी लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान या मिनी लॉकडाऊनला राज्यभरातून विरोध करण्यात येत आहे. दुकाने सुरू ठेवण्याच्या मागणीसाठी बुधवारी यवतमाळमधील व्यापाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.
लॉकडाऊनला व्यापाऱ्यांचा विरोध लॉकडाउचा आदेश मागे घ्यावा
सरकारने दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी, आम्ही शासनाच्या सर्व अटी, शर्थींचे पालन करून व्यवसाय करू, गेल्या वर्षी लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे आधीच मोठे नुकसान झाले आहे, आता पुन्हा लॉकडाऊन लावल्यास सर्व व्यापारी अडचणीत येतील, त्यामुळे शासनाने दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी, दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी दिली नाही, तर कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असा इशारा यावेळी व्यापाऱ्यांच्या वतीने देण्यात आला आहे.
हेही वाचा -कुर्ला परिसरातील भंगार दुकानाला लागलेल्या आगीवर नियंत्रण; दोन जण जखमी