यवतमाळ - शहरात 45 सुलभ शौचालय आहेत. मात्र, वर्षभरापासून स्वच्छता करण्यात आली नाही. त्यामुळे ही शौचालय घाणीच्या विळख्यात सापडली आहेत. शौचालय स्वच्छतेसाठी निविदा प्रक्रिया राबवावी लागते. परंतु आरोग्य विभाग दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नगराध्यक्ष कांचन चौधरी यांनी केला आहे.
शौचालयांची स्वच्छता अडकली निविदा प्रक्रियेत; नगराध्यक्ष म्हणतात, आरोग्य विभाग जबाबदार - यवतमाळ शौचालय स्वच्छ
एका वर्षांपासून शौचालयाची स्वच्छता करण्यात आली नाही. गोरगरीब लोक राहत असलेल्या नगरातील शौचालयाची ही अवस्था आहे.
हेही वाचा -VIDEO : पूरनने झळकावले यंदाच्या आयपीएलचे वेगवान अर्धशतक
एका वर्षांपासून शौचालयाची स्वच्छता करण्यात आली नाही. गोरगरीब लोक राहत असलेल्या नगरातील शौचालयाची ही अवस्था आहे. नगरसेवकांनी नगर परिषदेच्या सभेत वारंवार प्रश्न उपस्थित करून स्वच्छता करण्यासाठी सफाई कामगार उपलब्ध करून देण्याची मागणी केली. परंतु, त्याकडे कुणीही लक्ष दिले नाही, असा आरोप नगरसेवक करतात. त्यावर बोलताना नगराध्यक्ष चौधरी यांनी आरोग्य विभागाला जबाबदार धरले. स्वच्छता कंत्राट संपण्याच्या दोन महिण्यांपूर्वी निविदा प्रक्रियेला सुरुवात करायला पाहिजे. हे आरोग्य विभागाचे काम आहे. परंतु, आपल्या मर्जीतील ठेकेदारालाच मुदतवाढ दिली जावी, यासाठी प्रक्रिया राबवली जात नाही, असे नगराध्यक्ष कांचन चौधरी यांनी स्पष्ट केले.