यवतमाळ - जिल्ह्यात सोमवारी एकाच दिवशी सहा कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याने प्रशासन चांगलेच हादरले आहे. मार्च महिन्यात दररोज चार ते पाच मृत्यू होत असल्याने प्रशासनाकडून कठोर पावले उचलण्यात येत आहेत. तसेच एकाच दिवशी 367 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. तसेच वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हिड केअर सेंटर आणि कोव्हिड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 243 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.
हेही वाचा -शेतकऱ्याने मुलाप्रमाणे केले बैलावर प्रेम, वाजत गाजत काढली अंत्ययात्रा
सोमवारी 4161 रिपोर्ट प्राप्त
मृत झालेल्या व्यक्तिंमध्ये यवतमाळ येथील 55 आणि 25 वर्षीय महिला, दारव्हा तालुक्यातील 65 वर्षीय पुरुष आणि 78 वर्षीय महिला, दिग्रस तालुक्यातील 55 वर्षीय पुरुष आणि मानोरा तालुक्यातील (जि. वाशिम) 70 वर्षीय महिला आहे. सोमवारी पॉझेटिव्ह आलेल्या 367 जणांमध्ये 270 पुरुष आणि 97 महिला आहेत. यात दिग्रस येथील 126, यवतमाळातील 97, पांढरकवडा 26, महागाव 25, पुसद 24, नेर 23, वणी 14, कळंब 9, उमरखेड 6, दारव्हा 5, बाभुळगाव 4, आर्णि 2, राळेगाव 2, मारेगाव 1, झरी 1 आणि इतर ठिकाणचे 2 रुग्ण आहेत.