महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

यवतमाळमध्ये बाजारपेठेच्या वेळेत कपात; कोरोना प्रादुर्भावामुळे 'ही' वेळ निश्चित

ठरवून दिलेल्या कालावधीत आस्थापना, व्यक्ती व समूहाला सुट राहील. सर्व अत्यावश्यक सेवा व इतर सर्व सेवेच्या वस्तुंची दुकाने तसेच भाजीपाला व फळे विक्री सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. दुध विक्रेत्यांना गल्ली, कॉलनी, सोसायटीमध्ये जाऊन सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत व सायंकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत घरपोच विक्री करता येणार आहे.

yavatmal corona update
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता बाजारपेठेच्या वेळात कपात

By

Published : Jul 15, 2020, 7:52 AM IST

यवतमाळ - कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने अत्यावश्यक सेवा व इतर सर्व प्रतिष्ठाने, बाजारपेठ यांना मुभा देण्यात आलेली वेळ कमी करण्यात आली आहे. त्यानुसार यवतमाळ जिल्ह्यातील सर्व अत्यावश्यक सेवा व इतर सर्व सेवेची आणि वस्तुंची दुकाने व बाजारपेठ दिनांक 15 जुलैपासून ते पुढील आदेशापर्यंत सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याबाबत जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांनी आदेश दिले आहे.

ठरवून दिलेल्या कालावधीत आस्थापना, व्यक्ती व समूहाला सुट राहील. सर्व अत्यावश्यक सेवा व इतर सर्व सेवेच्या वस्तुंची दुकाने तसेच भाजीपाला व फळे विक्री सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. दुध विक्रेत्यांना गल्ली, कॉलनी, सोसायटीमध्ये जाऊन सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत व सायंकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत घरपोच विक्री करता येणार आहे. कृषी साहित्याची दुकाने, रासायनिक खतविक्री, बी-बियाणे विक्री व वाहतुक त्यांचे गोदामे, दुकाने सकाळी 10 ते दुपारी 5 या कालावधीत चालू राहतील. सर्व शासकीय व खाजगी दवाखाने, सर्व औषधी दुकाने आरोग्य कर्मचारी, वैद्यकीय रुग्णालयातील कर्मचारी वैद्यकीय अत्यावश्यक सर्व सेवा तसेच पशुवैद्यकीय दवाखाने व औषधालये दररोज 24 तास सुरू राहतील.

घरगुती गॅस घरपोच सेवा सकाळी 7 ते रात्री 7 या वेळेत वितरण करता येणार आहे. पेट्रोल डिझेल सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सुरू राहील. मात्र, अत्यावश्यक सेवेकरीता 24 तास सुरू राहील. जिल्ह्यातील सर्व बँका ग्राहकांसाठी सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सुरू राहतील. जिल्ह्यातील सर्व देशी विदेशी दारू विक्री बार सकाळी 10 ते दुपारी 2 या कालावधीत सुरू राहतील. तसेच चेहऱ्यावर मास्क न लावणे, सामाजिक अंतर न ठेवणे इत्यादी आदेशांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक व फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे.

तंबाखुजन्य पदार्थाचे सेवन, धुम्रपान करताना व थुकताना आढळल्यास रुपये 1 हजार रुपये दंड व 1 दिवस सार्वजनिक सेवा, दुसऱ्यांदा आढळल्यास रुपये 3 हजार दंड व 3 दिवसाची सार्वजनिक सेवा, तिसऱ्यांदा व त्यानंतर आढळल्यास रुपये 5 हजार दंड व 5 दिवस सार्वजनिक सेवा द्यावी लागेल. त्याचप्रमाणे सार्वजनिक स्थळी चेहऱ्यावर मास्क न वापरणे यासाठी रुपये 200 रुपये दंड व त्यानंतरही पुन्हा आढळल्यास फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details