महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

यवतमाळमध्ये वाघाची दहशत; आठवडाभरात तीन हल्ले - वाघ बातमी यवतमाळ

गाडेगाव शिवारात प्रमोद खंडाळकर या शेतकऱ्याच्या समोर अचानक वाघ आला. घाबरलेल्या शेतकऱ्याने सुसाट वेगाने पळ काढला. सुदैवाने वाघाने पाठलाग केला नाही म्हणून शेतकऱ्याचे प्राण वाचले.

tiger-attacked-on-cow-in-yavatmal
tiger

By

Published : Dec 31, 2019, 11:08 AM IST

यवतमाळ -येथील मारेगाव तालुक्यातील मार्डीपासून जवळच असलेल्या केगाव येथील सुरेश तुमराम यांच्या गायीवर वाघाने हल्ला केला. यात गायीचा मृत्यू झाला आहे. या परिसरात आठवडाभरात वाघाने अनेक जनावरांवर हल्ला केला आहे. त्यामुळे वाघाची दहशत पसरली आहे. शेतकरी, शेतमजूर भीतीने शेतात जाण्यास धजावत नाहीत.

हेहा वाचा-'लाथ मारेल तिथे..., मंत्रिमंडळ विस्तारांनतर रोहित पवारांची फेसबूक पोस्ट...

याच दिवशी दुपारच्या सुमारास गाडेगाव शिवारात प्रमोद खंडाळकर या शेतकऱ्याच्यासमोर अचानक वाघ आला. घाबरलेल्या शेतकऱ्याने सुसाट वेगाने पळ काढला. सुदैवाने वाघाने पाठलाग केला नाही म्हणून शेतकऱ्याचे प्राण वाचले. 20 डिसेंबरला वडगाव शिवारात किन्हाळा येथील विष्णुदास आडे यांची गाय, 23 डिसेंबरला आपटी येथील दत्तू बावणे यांचे शेतातील वासरू आणि आज केगाव येथे सुरेश तुमराम यांची गाय, असे एका पाठोपाठ घटना घडत असल्याने वर्धा नदी काठालगतच्या परिसरात वाघाचा वावर दिसून येत आहे. या घटनांमुळे या परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकरी, शेतमजूर शेतात जाण्यास तयार नसल्याचे दिसून येत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details