यवतमाळ : पांढरकवडा-यवतमाळ मार्गावरील पारवा गावाजवळ ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात एक कार झाडावर आदळली. ही घटना आज(रविवार) सकाळी साडेआठ वाजता घडली. या अपघातात तीन जण जागीच ठार झाले तर, एक जण गंभीर जखमी झाला आहे. त्याला जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले आहे.
चारचाकी झाडावर आदळून तीनजण जागीच ठार; पांढरकवडा-यवतमाळ मार्गावरील घटना - पांढरकवडा-यवतमाळ अपघात बातमी
यवतमाळमधील पारवा गावाजवळ एक कार झाडावर आदळली. या अपघातात तीन जण जागीच ठार झाले तर, एक जण गंभीर जखमी झाला आहे.

पांढरकवडा-यवतमाळ मार्ग कार अपघात बातमी
चारचाकी झाडावर आदळून तीनजण जागीच ठार
वाहनातील चारही जण अमरावती जिल्ह्यातील शिरसगाव येथील आंबा व्यापारी असल्याची माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलीस आणि ग्रामीण पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.