यवतमाळ - जिल्ह्यातील कळंब येथील पंचायत समितीसमोर नादुरुस्त ट्रकला नागपुरकडे जाणाऱ्या ट्रकने मागून धडक दिली. या अपघातात तीन जण जागीच ठार झाले. तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना यवतमाळ येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
दोन ट्रकच्या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू, दोन गंभीर जखमी
(एमएच 29-6516) हा ट्रॅक बंद पडल्याने कळंब येथील पंचायत समितीसमोर दुरुस्ती करण्याचे काम सुरू होते. अशातच यवतमाळ वरून नागपूरकडे जाणाऱ्या एका ट्रकने (एमपी 09-एचजी 9020) या ट्रकला मागून धडक दिली.
एमएच 29-6516 हा ट्रॅक बंद पडल्याने कळंब येथील पंचायत समितीसमोर दुरुस्तीसाठी उभा होता. अशातच यवतमाळ वरून नागपूरकडे जाणाऱ्या एमपी 09-एचजी 9020 या ट्रकने दुरस्तीसाठी उभ्या असलेल्या संबंधित ट्रकला मागून धडक दिली. या अपघातात संतोष पुरुषोत्तम करके (40, रा. मोहा) मनोज कापुरे (40, रा. मोहा) ट्रक चालक लखन बघेल (55 रा. घाट, तहसील मुलताई, जि. बैतुल मध्यप्रदेश) हे तिघे जण जागीच ठार झाले. तर इतर दोघे जखमी झाले आहेत. अपघात इतका भयंकर होता, की बघणाऱ्यांच्या अंगावर शहारे आले. या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
धडक देणाऱ्या ट्रक चालकास डुलकी लागल्याने हा अपघात झाल्याचे बोलले जाते. घटनेची माहिती मिळताच कळंब पोलीस ठाण्याचे ठाणेदार आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.