यवतमाळ- वीज तारांमध्ये घर्षण होऊन ठिणगी पडल्याने तीन हेक्टरमधील उभा ऊस जळल्याची घटना यवतमाळ तालुक्यातील रामनगर येथे घडली.
तीन हेक्टरमधील उसाला आग; शेतकऱ्याचे पंधरा लाखाचे नुकसान - उभा ऊस जळाला
वीज तारांमध्ये घर्षण होऊन ठिणगी पडल्याने तीन हेक्टरमधील उभा ऊस जळल्याची घटना यवतमाळ तालुक्यातील रामनगर येथे घडली.
नुकसानग्रस्त शेतकऱ्याने वीज वितरण कंपनीच्या कार्यालयातील अधिकाऱ्यांना निवेदन देऊन नुकसान भरपाईची मागणी केली आहे. विष्णू राठोड आणि रामधन राठोड, अशी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची नावे आहे. या दोघांच्या शेतातून वीजवाहिनी गेली आहे. वीज तारांमध्ये घर्षण होऊन ठिणगी पडल्याने या दोघांच्या शेतातील ऊस पिकांचे नुकसान झाले आहे. वीज तारांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होऊ शकते ही बाब यापूर्वी विद्युत कंपनीच्या निदर्शनास आणून दिली होती. याकडे मात्र दुर्लक्ष करण्यात आले होते. अखेर ठिणगी पडून शेतातील उभा ऊस जळाला. यात पंधरा लाखांचे नुकसान झाल्याचे विष्णू राठोड यांनी सांगितले.
यावेळी काही शेतकऱ्यांनी लागलेली आग विजवण्याचा प्रयत्न केला. मात्र, यात ऊस पिकांचे मोठे नुकसान झाले.