महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

यवतमाळमध्ये वीज अंगावर पडून तीघांचा मृत्यू - death

जिल्ह्यातील नेर, दिग्रस आणि उमरखेड तालुक्यात आज (शनिवार) सायंकाळच्या सुमारास वीज अंगावर पडून तीघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली.

विज कोसळून तिघांचा मृत्यू

By

Published : Jun 29, 2019, 8:04 PM IST

Updated : Jun 29, 2019, 11:53 PM IST

यवतमाळ : जिल्ह्यातील नेर, दिग्रस आणि उमरखेड तालुक्यात आज (शनिवार) सायंकाळच्या सुमारास वीज अंगावर पडून तीघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस, नेर आणि उमरखेड तालुक्यात सायंकाळच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली.

दिग्रस तालुक्यातील आरंभी येथील चंद्रभान दमडू चव्हाण (३३) रस्त्यालगत शेतात काम करीत असताना अचानक वीज अंगावर पडल्याने घटनास्थळी मूत्यू झाला.

दुसऱ्या घटनेत नेर तालुक्यातील मारवाडी या गावातील दादाराव रुपाजी राठोड(५७) यांचाही शेतात काम करताना अंगावर वीज पडून मृत्यू झाला. तर तिसऱ्या घटनेत उमरखेड तालुक्यातील निंगणूर येथील प्रकाश रघुनाथ मानतूटे (१८) त्याचाही वीज अंगावर पडून मृत्यू झाला.

Last Updated : Jun 29, 2019, 11:53 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details