यवतमाळ -मागील प्रकरणात विविध प्रकारचे आरोप करून विरोधकांनी मला आरोपीच्या पिंजऱ्यात आणून ठेवले. आता पुन्हा नवीन षड्यंत्र विरोधकांकडून रचल्या जात आहे. मला राजकीय आयुष्यतून उद्ध्वस्त करण्याचा हा डाव आहे. पण मी रडणारा नसून लढणारा कार्यकर्ता आहे, असा निर्धार आमदार संजय राठोड यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त करीत आपल्यावर ज्या महिलेने घाणेरडे आरोप केले ते सर्व फेटाळून लावले आहे. घाटंजी तालुक्यातील एका महिलेने माजी मंत्री तथा आमदार संजय राठोड यांच्यावर शरीरसुखाची मागणी केल्याचा आरोप केला होता. त्यासंदर्भात या महिलेने जिल्हा पोलीस अधीक्षक व घाटंजी पोलीस ठाण्यात स्पीड पोहोचणे तक्रारही दाखल केली होती. या तक्रारीला अनुसरून भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी ट्विट केले होते. त्यामुळे माजी मंत्री तथा आमदार संजय राठोड हे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात आले.
मला संबंधितांकडून धमकीचे मेसेज -
आमदार संजय राठोड यांच्या शिवपूर येथे आश्रम शाळा चालवली जाते. या शाळेतील तीन शिक्षकांना काही वर्षापूर्वी गैरवर्तन एकीचा ठपका ठेवून निलंबित करण्यात आले. हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. पण पुन्हा नोकरीवर घेण्यात यावे, यासाठी हा सर्व खटाटोप करण्यात येत असल्याचेही यावेळी पत्रकार परिषदेत सांगितले. फेब्रुवारी महिन्यात झालेल्या प्रकरणामुळे तुमचा राजकीय जीवन उद्ध्वस्त झाले. आणि आता पुन्हा सर्वच प्रकार होऊ नये, असे धमकीचे मेसेज सुद्धा मला संबंधितांकडून येत होते. या संपूर्ण प्रकरणाची मला आलेल्या अनोळखी नंबरवरील मेसेजची तक्रार सुद्धा मी अवधूतवाडी पोलीस ठाणे, वडगाव जंगल पोलीस ठाणे येथे दाखल केली आहे. त्यामुळे त्याचे सर्व आरोप हे बिनबुडाचे असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. स्थानिक आणि राज्य स्तरावरील विरोधकांकडून याला खतपाणी मिळत असल्याने हा प्रकार सुरू असल्याचेही यावेळी ते बोलले.
हेही वाचा -राज्य महिला व बालविकास विभाग घोटाळा प्रकरण; नवनीत राणांचे यशोमती ठाकुरांना प्रत्यूत्तर