महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

यवतमाळमध्ये एकाच दिवशी 37 कोरोना रुग्णांचा मृत्यू; तर 810 नव्या रुग्णांची भर - यवतमाळ कोरोना बातम्या

आज यवतमाळमध्ये 37 कोरोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला असून 810 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. आज 892 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.

thirty seven patient died because of covid in yavatmal
thirty seven patient died because of covid in yavatmal

By

Published : Apr 19, 2021, 8:06 PM IST

यवतमाळ - जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आज 37 कोरोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला असून 810 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. आज 892 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.

रिपोर्ट

एकूण 923 मृत्यूची नोंद -

आज 4619 जणांचे कोरोना चाचणी अहवाल प्राप्त झाले असून यापैकी 810 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात 5720 सक्रिय रुग्ण असून यापैकी 2770 रुग्णालयात भरती आहे. तर गृह विलगीकरणात 2950 रुग्ण आहेत. त्यामुळे आतापर्यंत एकूण पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या 41457 झाली आहे. तसेच 24 तासांत 892 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 34814 आहे. तर जिल्ह्यात एकूण 923 मृत्यूची नोंद आहे.

पॉझिटीव्हीटी दर 11.87 टक्के तर मृत्युदर 2.23 टक्के -

सोमवारी पॉझिटीव्ह आलेल्या 810 जणांमध्ये 475 पुरुष आणि 335 महिलांचा समावेश आहेत. यात यवतमाळ येथील 300 रुग्ण, पांढरकवडा 152, उमरखेड 75, दिग्रस 69, पुसद 33, वणी 31, कळंब 29, नेर 28, बाभुळगाव 21, घाटंजी 12, मारेगाव 11, राळेगाव 11, महागाव 10, दारव्हा 10, आर्णि 9, झरीजामणी 1 आणि इतर शहरातील 8 रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत 349389 नमुने पाठविले असून यापैकी 346294 प्राप्त तर 3095 अप्राप्त आहेत. तसेच 304837 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटीव्ह आल्याचे आरोग्य विभागाने कळविले आहे.

हेही वाचा - 'मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आता पीपीई किट घालून बाहेर पडावे'

ABOUT THE AUTHOR

...view details