महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

झरीमध्ये बिअर बारवर दरोडा, 33 हजाराचा दारूसाठा लंपास - कोरोना विषाणू

वणी येथील रहिवाशी असलेले राहुल डफ यांचे झरी येथे राहुल नावाचा बिअर बार आहे. मंगळवारी या परिसरात वादळी वारा होता. त्यामुळे तिथे चौकीदार नव्हता. याचाच फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने बारला लावलेले शेटरचे लॉक तोडून 33 हजाराचा मुद्देमाल लंपास केला आहे.

Zari
झरीमध्ये बिअर बारवर दरोडा

By

Published : Apr 1, 2020, 2:48 PM IST

यवतमाळ- कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी संपूर्ण भारतामध्ये 21 दिवसांचा लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे बिअर बार आणि वाईन शॉप बंदचे आदेश शासनाने दिले आहेत. त्यामुळे सर्व बार आणि शॉप बंद आहेत. यायाच फायदा घेऊन यवतमाळच्या झरीमध्ये चोरट्याने एक बिअर बार फोडले आहे. यावेळी या चोरट्याने एकूण 33 हजाराचा मुद्देमाल लंपास केला आहे.

झरीमध्ये बिअर बारवर दरोडा

याबाबत अधिक माहिती अशी की, वणी येथील रहिवाशी असलेले राहुल डफ यांचे झरी येथे राहुल नावाचा बिअर बार आहे. मंगळवारी या परिसरात वादळी वारा होता. त्यामुळे तिथे चौकीदार नव्हता. याचाच फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने बारला लावलेले शेटरचे लॉक तोडले. आत प्रवेश केला व बारमधील जवळपास सर्वच माल उचलून नेला. बारमध्ये विविध कंपन्यांचा एकूण 33 हजारांचा माल होता.

सकाळी बार फोडल्याचे उघडकीस येताच स्थानिक रहिवाशी ज्ञानेश्वर अरके यांनी बार मालक राहुल डफ यांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर राहुल डफ यांनी चोरीची माहिती पाटण पोलीस ठाण्याला दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला. पुढील तपास पाटण पोलिस ठाण्याचे ठाणेदार करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details