महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

चोरट्यांनी एटीमच केले लंपास; महागाव तालुक्यातील घटना - यवतमाळ शहर बातमी

महागांव शहरातील इंडिया वन या कंपनीचे एटीएम मशीन चोरट्यांनी पैशासह लांबवले आहे. या मशीनमध्ये 8 जून रोजीच त्या एटीएममध्ये पाच लाख रुपये भरले होते, अशी बोलले जात आहे.

घटनास्थळ
घटनास्थळ

By

Published : Jun 11, 2021, 4:55 PM IST

Updated : Jun 11, 2021, 5:12 PM IST

यवतमाळ - महागांव शहरातील प्रभाग एकमध्ये इंडिया वन या कंपनीचे एटीएम मागील सहा महिन्यांपूर्वी सुरू करण्यात आले होते. रात्री पावसाचा फायदा घेत तोडफोड न करता सहजरित्या पूर्ण एटीएम मशीनच चोरट्याने लांबवल्याची घटना सकाळी (दि. 11 जून) उघडकीस आली आहे.

घटनास्थळ

घटनास्थळी श्वान पथकास पाचारण

या चोरीसाठी चाव्यांचा वापरही करण्यात आल्याचे आढळून आले आहे. दिनांक 8 जून रोजी या एटीएममध्ये पाच लाख टाकल्याचे बोलले जात असून नेमके किती रुपयाची चोरी झाली हे उघड झाले नाही. या चोरीमध्ये किमान चार ते पाच चोरटे असण्याची शक्यता आहे. घटनास्थळी महागांव पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पोहोचून पंचनामा केला. यावेळी श्वानपथकासही पाचारण केले होते.

हेही वाचा -वनोजा (देवी) येथे 50 लाखांचा अवैध रेतीसाठा जप्त

Last Updated : Jun 11, 2021, 5:12 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details