यवतमाळ - शहरातील दत्त चौकात असलेले वाईनशॉप चोरट्यांनी फोडल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री घडली. या वाईनशॉपमधून चोरट्यांनी तब्बल तीन लाखांचा मुद्देमाल लंपास केला आहे. त्यामध्ये दीड लाख रोख, लॅपटॉप आणि देशी-विदेशी दारूंच्या बाटल्यांचा समावेश आहे.
वाईनशॉप फोडून लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास, अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल - यवतमाळ गुन्हे वृ्त्त
शहरातील दत्त चौकात असलेले वाईनशॉप चोरट्यांनी फोडल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री घडली. या वाईनशॉपमधून चोरट्यांनी तब्बल तीन लाखांचा मुद्देमाल लंपास केला आहे. त्यामध्ये दीड लाख रोख, लॅपटॉप आणि देशी-विदेशी दारूंच्या बाटल्यांचा समावेश आहे.
दरम्यान ही घटना सकाळी साडेनऊच्या सुमारास उघड झाली. याप्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रात्री साडेबाराच्या सुमारास वाईनशॉपच्या दुकानाची पाठीमागील भिंत लोखंडी रॉडने फोडून, चोरट्यांनी आत प्रवेश केला. यावेळी काउंटरमधील रोख रक्कम व देशी-विदेशी दारूच्या बाटल्या असा एकूण तीन लाखांचा मुद्धेमाल चोरट्यांनी लंपास केला. चोरट्याला काऊंटरमध्ये पैसे दिसताच चोरटा आनंदाने नाचत असल्याचा व्हिडिओ सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.