यवतमाळ- पैनगंगा नदीच्या गाळात अडकून एका शेतकरी तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना फुलसांवगीत घडली आहे. शंकर पुरी(२२) असे त्या तरुणाचे नाव आहे. जनावरे चारायला गेल्यानंतर ही घटना घडली आहे.
पैनगंगेच्या गाळात अडकून शेतकरी तरुणाचा दुर्दैवी मृत्यू - death
शेतकरी कुटुंबातील २२ वर्षीय तरुण घरच्या गायी आणि बैलांना चरावयास घेऊन गेला होता. यावेळी नदीकाठच्या गाळात फसून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
शंकर बराच वेळ होऊनही परत आला नसल्याने घरच्यांनी त्याची शोधाशोध सुरु केली. यावेळी शोधकरत्यांना फुलसावंगी येथे गायी, बैल शेतात चरत असताना दिसल्या. परंतु, शंकर कुठेच दिसत नव्हता. सगळीकडे चिखल असल्यामुळे त्याच्या पावलांच्या निशाणीवरून त्याचा शोध घेण्यात आला. यावेळी शंकरचा मृतदेह गाळात फसलेल्या अवस्थेत आढळून आला.
घटनेची माहिती महागाव पोलीस ठाण्याल देण्यात आली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी सवना ग्रामीण रुग्णालयात पाठविला. महागाव पोलीस पुढील तपास करीत आहे