यवतमाळ - 'पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने विजय मिळवला आहे. या विजयाचा जल्लोष करताना त्यांना सत्तेचा उन्माद चढला आहे. तृणमूल काँग्रेसच्या पाठीराख्यांनी सर्व राजकीय संकेत बाजूला ठेवले. भाजपच्या पाठीराख्यांवर कोण हल्ले करत आहेत?' असे म्हणत, जिल्हा भाजपच्या वतीने या घटनेचा काळे झेंडे दाखवून निषेध करण्यात आला.
तृणमूल काँग्रेसला सत्तेचा जल्लोष नव्हेतर उन्माद चढला; भाजपाकडून काळे झेंडे दाखवून निषेध
पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजप कार्यकर्त्यांवर झालेल्या हल्ल्याचा यवतमाळ येथे जिल्हा भाजपच्या वतीने काळे झेंडे दाखवून निषेध करण्यात आला आहे.
'पश्चिम बंगालमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात हल्ले होत असतांना, पुरोगामी महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्षाच्या एकाही मंत्र्याने अथवा पदाधिकाऱ्यांनी या बाबींचा साधा निषेध सुद्धा केलेला नाही. याचा अर्थ या हल्ल्यात काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना या पक्षाची मूकसंमती आहे. पश्चिम बंगालमधील भाजपच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या मागे जिल्हा भाजपचे सर्व पदाधिकारी ठाम उभे असून या हल्ल्याचा तसेच याबाबत मूग गिळून बसलेल्या महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्षाचा जाहीर निषेध करत असल्याचे', जिल्हा महामंत्री राजू पटगीलवार हे म्हणाले आहेत.
हेही वाचा -पंढरपुरात मराठा समाजाच्यावतीने अर्धनग्न आंदोलन; सरकारचा जाहीर निषेध