यवतमाळ: नागपूरवरून नांदेड कडे जात असलेल्या MH 26 BE 6814 हा ट्रेलर टिनपत्रे घेऊन जात होता. ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाघाडी पुलावरून ट्रेलर पुलावरून खोल जाऊन आदळला. यात एकजण जागीच ठार झाला.
Trailer Collapsed : पुलावरून ट्रेलर कोसळला, एकाचा मृत्यू एक गंभीर - या अपघातात एकाचा मृत्यू
नागपूर- तुळजापूर महामार्गावर (Nagpur-Tuljapur Highway) यवतमाळ जवळच असलेल्या वाघाडी गावा जवळील पुलावरून जात असलेला एक ट्रेलर पुलावरुन कोसळला (Trailer Collapsed). चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातात एकाचा मृत्यू (One died in the accident) झाला.
ट्रेलर कोसळला
हा अपघात इतका भयावह होता की, ट्रेलर चे दोन तुकडे झाले. अवधुत वाडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मनोज केदारे यांनी घटना स्थळी भेेट दिली. या अपघात एक गंभीर जखमी झाला असून त्याला शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे. मृतक व गंभीर जखमी यांची ओळख अद्याप पटलेली नाही. ट्रक चालकाला क्रेनच्या साहाय्याने बाहेर काढण्यात यश आले.