यवतमाळ - राजधानी दिल्लीत येत्या 26 जानेवारीला होणाऱ्या पथसंचलनात महाष्ट्रातील संतांचे दर्शन घडविणाऱ्या चित्ररथाचा समावेश आहे. विशेष म्हणजे चित्ररथावरील महाराष्ट्रातील संतांची शिल्पे ही यवतमाळच्या मातीत बनली आहेत. ही यवतमाळ जिल्हासाठीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी गौरवाची बाब आहे. दारव्हा तालुक्यातील अतिशय ग्रामीण भागात नखेगाव येथे राहत असलेल्या प्रवीण पिल्लारे, असे या शिल्पकाराचे आहे.
छंदातूनच शिल्पकलेचा जन्म
दरवर्षी येथील भव्यदिव्य पथसंचलनात वेगवेगळ्या प्रांताच्या चित्ररथ पथसंचलनात सहभागी होत असतात. यावर्षीच्या चित्ररथासाठी संतांचे शिल्प साकरण्यात आली आहेत. यामध्ये संत ज्ञानेश्वर, संत जनाबाई, संत तुकाराम, विठ्ठल, चोखामेळा, गोरोबा कुंभार आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वयंचलित दर्शन प्रजासत्ताकदिनी सर्व जगास घडवणार आहेत. शिल्प साकारणारा नवोदित कलावंत हा यवतमाळ जिल्ह्याच्या दारव्हा तालुक्यातील नखेगाव येथील प्रवीण पिल्लारे आहे. अगदी लहान वयापासूनच मातीशी खेळण्याचा छंद होता. त्यामूळे या छंदातूनच शिल्पकलेचा जन्म झाल्याचे तो सांगतो. .