महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जिल्ह्याचा रिकव्हरी रेट 90 टक्क्यांच्या वर; गेल्या २४ तासांत ५२९ पॉझिटिव्ह, ९९३ कोरोनामुक्त - Corona patient number Yavatmal

गत पंधरवड्यात 83 टक्क्यांच्या आसपास असलेला जिल्ह्याचा रिकव्हरी रेट आता 90 टक्क्यांवर गेला आहे. चालू आठवड्यात सतत सहाव्या दिवशीसुद्धा कोरोनाबाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त आहे. जिल्ह्यासाठी हे नक्कीच दिलासादायक चित्र असून जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाच्या सामुहिक प्रयत्नांचे हे फलित आहे.

Corona free patient Yavatmal district
कोरोना आढावा यवतमाळ

By

Published : May 15, 2021, 8:05 PM IST

यवतमाळ - गत पंधरवड्यात 83 टक्क्यांच्या आसपास असलेला जिल्ह्याचा रिकव्हरी रेट आता 90 टक्क्यांवर गेला आहे. चालू आठवड्यात सतत सहाव्या दिवशीसुद्धा कोरोनाबाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त आहे. जिल्ह्यासाठी हे नक्कीच दिलासादायक चित्र असून जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाच्या सामुहिक प्रयत्नांचे हे फलित आहे.

जिल्ह्याचा रिकव्हरी रेट 90 टक्क्यांच्या वर

हेही वाचा -यवतमाळ : लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा धडाका, 8 लाख 55 हजारांचा दंड वसूल

60 हजार 496 जणांनी केली कोरोनावर मात

सुरवातीपासून आतापर्यंत जिल्ह्यातील 60 हजार 496 जणांनी कोरोनावर मात केली असून बरे होण्याचे प्रमाण 90.28 टक्के आहे. गत 24 तासांत जिल्ह्यात कोरोनाबाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त आहे. जिल्ह्यात 529 जण पॉझिटिव्ह, तर 993 जण कोरोनामुक्त झाले असून 20 जणांचा मृत्यू झाला आहे. दोन मृत्यू जिल्ह्याबाहेरील (नांदेड आणि वाशिम) आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 12 मृत्यू, डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये दोन, तर खासगी रुग्णालयातील सहा मृत्यू आहे.

4 हजार 903 रुग्ण ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह

सद्यस्थितीत जिल्ह्यात 4 हजार 903 रुग्ण ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह असून यापैकी रुग्णालयात भरती 2 हजार 280, तर गृह विलगीकरणात 2 हजार 623 रुग्ण आहेत. तसेच, आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 67 हजार 4 झाली आहे. 24 तासांत 993 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 60 हजार 496 आहे. तर, जिल्ह्यात एकूण 1 हजार 605 मृत्यूची नोंद आहे. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी दर 12.80, तर मृत्यूदर 2.40 इतका आहे.

989 बेड उपलब्ध

जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, दहा डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर आणि 30 खासगी कोविड रुग्णालयांमध्ये एकूण 989 बेड उपलब्ध आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 577 बेडपैकी 400 बेड रुग्णांसाठी उपयोगात, 177 बेड शिल्लक, दहा डीसीएचसीमध्ये एकूण 516 बेडपैकी 167 रुग्णांसाठी उपयोगात, 349 बेड शिल्लक आणि 30 खासगी कोविड रुग्णालयात एकूण 1 हजार 99 बेडपैकी 636 उपयोगात, तर 463 बेड शिल्लक आहेत.

हेही वाचा -यवतमाळ : कोविशिल्डच्या दुसऱ्या डोजचा कालावधी 12 ते 16 आठवड्यांचा

ABOUT THE AUTHOR

...view details