यवतमाळ - तायडे नगर परिसरातील एक 42 वर्षांची व्यक्ती आरोग्याच्या समस्या असल्याने जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती झाली. चार दिवसानीं प्रकृती सुधारल्याने त्याला डिस्चार्ज देण्यात आला. मात्र, यानंतर संबंधित व्यक्तीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने रुग्णालयाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. मात्र रात्री उशिरा पुन्हा रुग्णाला शोधण्यात आले असून त्याचावर पुन्हा उपचार सुरू करण्यात आले आहेत.
अस्थमाचा त्रास होत असल्याने एक व्यक्ती 20 जुलैला जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाली. यावेळी त्यांचे स्वॅब घेण्यात आले. संबंधिताचा पहिला अहवाल निगेटिव्ह आला. त्यानंतर उपचार करण्यात आले; आणि बरे वाटत असल्याने 24 जुलै रोजी डिस्चार्ज देण्यात आला. मात्र 26 जुलै रोजी त्याचा दुसरा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यामुळे चांगलीच खळबळ उडाली.