यवतमाळ -'ब्रेक द चेन'अंतर्गत शहरी व ग्रामीण भागात लावलेले कडक निर्बंध आणि कोरोना चाचण्या वाढवल्यामुळे मागील आठवड्याभरात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. तसेच, मृत्यूच्या प्रमाणातही मोठी घट झालेली आहे. मागील 24 तासांत जिल्ह्यात 322 जण पॉझिटिव्ह, तर 617 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर, 15 जणांचा मृत्यु झाला आहे.
जिल्ह्यात 3061 रुग्ण ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह
रविवारी एकूण 6790 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 322 जण नव्याने पॉझेटिव्ह आले. तर, 6468 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 3061 रुग्ण पॉझिटिव्ह आहेत. यापैकी 1536 रुग्णालयात भरती आहेत. गृह विलगीकरणात 1525 रुग्ण आहेत. आता एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 70709 झाली आहे. 24 तासात 617 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या आता 65933 आहे. तर, जिल्ह्यात एकूण 1715 मृत्युची नोंद आहे. सध्या जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 12.17 टक्के, तर मृत्युदर 2.43 टक्के इतका आहे.