यवतमाळ - घरगुती वापराचा सिलिंडर लीक झाल्याने घराला आग लागल्याची घटना जिल्ह्यातील झरी तालुक्यातील गणेशपूर येथे घडली. या आगीमध्ये घरातील साहित्य जाळून खाक झाले असून कोणतीही जीवितहानी झाली नाही.
सिलिंडर लीक झाल्याने गणेशपूर येथे घराला आग लागली होती. हेही वाचा- 'अवनी' वाघिणीनंतर पांढरकवड्यात पुन्हा वाघाचा धुमाकूळ; एक शेतकरी ठार
गणेशपूर येथील राजू आसुटकर यांच्या पत्नी चहा बनविण्याकरिता स्वयंपाक खोलीत गेल्या होत्या. यावेळी शेगडी पेटवली असता शेगडीसह सिलेंडरला आग लागली आणि भडका उडाला. सिलेंडर मधून गॅस लीक होत असल्याने ही आग लागली. गावकऱयांनी तात्काळ मदत करीत ही आग विझवली. या आगीमुळे घराचे खूप नुकसान झाले आहे.
हेही वाचा- यवतमाळ जिल्ह्यातील आदर्श गावाची वाट बिकट!