महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पालकमंत्र्यांनी अचानक दिली रोजगार हमी योजनेच्या कामाला भेट - Malkhed taluka

पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी नेर तालुक्यातील मालखेड येथे वनविभागाच्या रोपवाटिकेला भेट देऊन रोजगार हमी योजनेच्या कामाची पाहणी केली. अचानक दिलेल्या या भेटीमुळे अधिकाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली होती.

पालकमंत्रांची रोपवाटिकेला भेट
पालकमंत्रांची रोपवाटिकेला भेट

By

Published : Apr 21, 2021, 10:38 PM IST

यवतमाळ - राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी नेर तालुक्यातील मालखेड येथे वनविभागाच्या रोपवाटिकेला भेट देऊन रोजगार हमी योजनेच्या कामाची पाहणी केली. अचानक दिलेल्या या भेटीमुळे अधिकाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली होती.

मजूरांच्या मस्टरची तपासणी

रोजगार हमी योजनेंतर्गत पूर्व पावसाळी कामे त्वरीत सुरू करून जुलैमध्ये वृक्षारोपणाची कामे सुरू होणे गरजेचे आहे. वृक्ष लागवड ही एक चळवळ असून ग्रामपंचायत, रोजगार हमी योजना, वनविभाग, सामाजिक वनीकरण विभाग, कृषी विभाग व इतर सर्व विभाग वृक्षारोपण करू शकतात. त्यामुळे रोपांची संख्या कमी पडता कामा नये. यावेळी त्यांनी मजूरांच्या मस्टरची तपासणी केली. तसेच करंजी, जांभूळ, सीसम, आवळा आदी रोपट्यांची पाहणी केली. मालखेड येथील रोपवाटिकेत सामाजिक वनीकरण विभागाच्या माध्यमातून 50 हजार लहान रोपे तयार करण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत या कामावर 7.20 लक्ष रुपयांपैकी 3.19 लक्ष रुपये खर्च करण्यात आले आहे. तसेच निर्माण झालेल्या मनुष्य दिवसांची संख्या 1 हजार 410 आहे, अशी माहिती सामाजिक वनीकरण विभागाने दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details