महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Body Of Baby Girl :अखेर बेपत्ता चिमुकलीचा मृतदेह सापडला - घातपाताचा संशय

सहा दिवसांपासून बेपत्ता असलेल्या (Missing for six days) कुऱ्हा डुंमना येथील तीन वर्षीय चिमुकली मानवी चोलेचा मृतदेह (The body of baby girl ) अखेर तिच्या घराच्या मागे, पाण्याच्या टाकीत सापडला आहे. या प्रकरणात घातपाताचा संशय (Doubt of assassination) असून नातेवाईकांनीच मानवीची हत्या केल्याचा संशय व्यक्त होत आहे. मानवीला आधी धान्याच्या डब्यात कोंडले, नंतर बाथरूम जवळ आणले अशी माहिती समोर आली आहे.

The body of baby girl
अखेर चिमुकलीचा मृतदेह सापडला

By

Published : Dec 27, 2021, 11:27 AM IST

यवतमाळ: आर्णी तालुक्यातील कुऱ्हा येथील तीन वर्षीय मानवी ही 20 डिसेंबर पासून बेपत्ता (Missing for six days) होती. तीला शोधण्यासाठी कुऱ्हा गावाला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते. गावशेजारील जंगल परिसरात व इतर ठिकाणी तिचा शोध सुरू होता.

अखेर चिमुकलीचा मृतदेह सापडला

डॉग स्कॉडलाही प्राचारण करण्यात आले होते.अखेर 26 डिसेंबरच्या रात्री तिचा तिचा मृतदेह पाण्याचा टाकीत सापडला. एलसीबी, फिंगर, डाॅग स्काॅड, फाॅरिन्सिक, सायबर सेल असे सर्व पथक रात्री घटनास्थळी दाखल झाले होते. या प्रकरणी तीन नातेवाईकांना पोलीसांना ताब्यात घेतले आहे. मृतक मानवीचा मृत्यूदेह शवविच्छेदनासाठी आर्णी रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. मानवीचा मृत्यू कशामुळे झाला हे शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालनंतर स्पष्ट होणार आहे. नातेवाईकांनीच मानवीची हत्या केल्याचा संशय (Doubt of assassination) पोलीसांना आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details