यवतमाळ -सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध लैंगिक शोषण केल्याची तक्रार करुणा शर्मा या महिलेने केली आहे. त्यामुळे मुंडे यांना मंत्रिमंडळात राहण्याचा कुठलाच अधिकार नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या विषयावर गप्प बसून असल्याने या झालेल्या प्रकरणाला त्यांचीही मूकसंमत्ती असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे त्यांनीही आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, या मागणीसाठी भाजप महिला आघाडीच्या वतीने मंगळवारी (दि. 19 जाने.) आंदोलन करण्यात आले.
सामाजिक न्याय मंत्री मुंडेंसह मुख्यमंत्र्यांनीही राजीनामा द्यावा - भाजप
सामाजिक न्याय मंत्री यांच्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप झाले आहेत. मात्र, या विषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काहीच भाष्य केले नाही. यामुळे या प्रकरणाला त्यांचीही मूकसंमत्ती असल्याचे आरोप करत मुख्यमंत्र्यांनीही राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपच्या वतीने यवतमाळमध्ये करण्यात आली आहे.
सामाजिक न्याय मंत्री हे जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी असतात. मात्र, मुंडे यांच्या विरुद्ध एका महिलेने गंभीर तक्रार केली आहे. मात्र, कुठलीच दखल घेतली नाही. कोरोना काळात महिलांवर अत्याचार होत होते तेव्हाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गप्प होते. आता मुंडे प्रकरणातही मुख्यमंत्री गप्प आहेत. त्यामुळे मुंडे यांचा राजीनामा घ्यावा, अन्यथा मुख्यमंत्री ठाकरे यांनी देखील आपल्या पदाचा राजीनामा देऊन खूर्ची खाली करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या आंदोलनात भाजप महिला आघाडीच्या महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.
हेही वाचा -बर्ड फ्लूची धास्ती: यवतमाळात साडेतीन हजार कोंबड्यांचा मृत्यू