महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बसमधील मृतकांच्या नातेवाईकांना दहा लाखाची मदत देणार - खासदार हेमंत पाटलांची माहिती

शिवसेनेचे माजी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी अशा घटनेतील मृतकांच्या कुटूंबियांना दहा लाख देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार या अपघातातील मृतकांच्या कुटूंबियांना सरकारकडून दहा लाखाची मदत देणात येणार असल्याचे खासदार हेमंत पाटील यांनी सांगितले.

खासदार हेमंत पाटलांची माहिती
खासदार हेमंत पाटलांची माहिती

By

Published : Sep 29, 2021, 12:07 AM IST

यवतमाळ- नांदेड ते नागपूरसाठी निघालेल्या बसला उमरखेड ते पुसद मार्गावरील दहागाव जवळील नाल्याला आलेल्या पुरात एसटी बस वाहून गेली. यात चालक आणि वाहक यांच्यासह दोन प्रवाशांचा मृत्यू झाला. तर दोघांना वाचविण्यात यश आले असून क्रेनच्या साहाय्याने बस बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. या अपघाताची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देण्यात आली असून त्यांनी शोक व्यक्त केला.

बसमधील मृतकांच्या नातेवाईकांना दहा लाखाची मदत देणार

शिवसेनेचे माजी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी अशा घटनेतील मृतकांच्या कुटूंबियांना दहा लाख देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार या अपघातातील मृतकांच्या कुटूंबियांना सरकारकडून दहा लाखाची मदत देणात येणार असल्याचे खासदार हेमंत पाटील यांनी सांगितले. तसेच रात्र झाल्यामुळे शोधकार्य थांबविण्यात आले असून उद्या सकाळी बेपत्ता असलेले एसटी चालक आणि पाण्यात आसलेली एसटी बाहेर काढण्यासाठी कार्य सुरू करणार असल्याचे सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details