महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Nov 5, 2020, 8:06 PM IST

ETV Bharat / state

तक्रारदारच निघाला आरोपी..! टेम्पोचालकाने केला होता चोरीचा बनाव

चोरीचा बनाव करणाऱ्या तक्रारदार टेम्पोचालकाला यवतमाळ ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसी खाक्या दाखवताच लपवून ठेवलेले 8 लाख रुपये चालकाने काढून दिले.

जप्त केलेले पैसे व अटकेतील आरोपीसह पोलीस पथक
जप्त केलेले पैसे व अटकेतील आरोपीसह पोलीस पथक

यवतमाळ - टेम्पो चालकाला अडवून त्याच्याजवळील आठ लाख रुपयांची रोकड लुटल्याची घटना करळगाव घाटात बुधवारी (दि. 4 नोव्हेंबर) सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास घडली होती. या प्रकरणी यवतमाळ ग्रामीण पोलिसांनी आपल्या तपासाची चक्रे फिरवली. यात चोरीचा बनाव असल्याचे निष्पन्न झाले.

माहिती देताना सहायक पोलीस निरीक्षक

तक्रारदारच निघाला आरोपी

वाहनचालकाने स्वतः या चोरीची तक्रार दिली होती. मात्र, त्याचा हा डाव अपयशी झाला असून स्वतःच पैसे हडपल्याचा प्रकार यवतमाळ ग्रामीण पोलिसांनी उघडकीस आणला आहे. याप्रकरणी त्याच्याकडून करळगाव घाटात खड्डा करून लपवून ठेवलेली रोकड हस्तगत करण्यात आली आहे. यामुळे फैसल खान मेहमूद खान हा तक्रारदाच आरोपी ठरला आहे. त्यानंतर टेम्पो मालक पवन गांधी यांच्या तक्रारावरुन पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

हेही वाचा -पैनगंगा अभयारण्यातील 21 गावांत मूलभूत सुविधेचा अभाव; जिल्हाधिकाऱ्यांकडून अधिकाऱ्यांची कान उघडणी

ABOUT THE AUTHOR

...view details