महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोणत्याही स्थितीत बोगस बियाणांचे वाटप होता कामा नये - जिल्हाधिकारी येडगे - जिल्हाधिकारी अमोल येडगे

बोगस बियाणे विक्री करणाऱ्या प्रतिष्ठानाचा शोध घ्या, त्यासाठी विशेष शोध मोहीम राबवा, तसेच चोरट्या मार्गानेसुध्दा बियाणांची वाहतूक न होऊ देण्यासाठी पोलीस विभागाची मदत घ्या, असे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.

बोगस बियाणांचे वाटप होता कामा नये -
बोगस बियाणांचे वाटप होता कामा नये -

By

Published : May 6, 2021, 9:44 AM IST

यवतमाळ - महाबीजने जिल्ह्याला सोयाबीन बियाणांचा पर्याप्त स्वरुपात पुरवठा करावा. तसेच खासगी कंपन्यांकडूनसुध्दा जास्तीत जास्त सोयाबीनचे बियाणे जिल्ह्याला उपलब्ध होईल, यासाठी कृषी विभागाने रोज पाठपुरावा करावा. कोणत्याही परिस्थितीत जिल्ह्यात बोगस बियाणांचे वाटप होता कामा नये, यासाठी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी निर्देश दिले आहेत.

बोगस बियाणे विक्री करणाऱ्या प्रतिष्ठानाचा शोध घ्या, त्यासाठी विशेष शोध मोहीम राबवा, तसेच चोरट्या मार्गानेसुध्दा बियाणांची वाहतूक न होऊ देण्यासाठी पोलीस विभागाची मदत घ्या.
कृषी सहाय्यक शेतक-यांच्या बांधावर दिसले पाहिजे, जिल्ह्यात अप्रामाणिक नमुने सापडल्यास तत्काळ कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

घरगुती बियाणांचा वापर करण्याचे आवाहन-

खरीप हंगाम सुरू झाल्यामुळे कृषी निविष्ठा खरेदी करण्यासाठी शेतक-यांची लगबग सुरू आहे. अशा परिस्थितीत चांगली उगवण क्षमता असलेले बियाणे तसेच उत्कृष्ट दर्जाच्या कृषी निविष्ठा शेतक-यांना उपलब्ध करून देण्याची जबाबदारी कृषी विभागाची आहे. त्यासाठी दैनंदिन पाठपुरावा करून जिल्ह्यात बियाणे, खते आदींची कमतरता पडणार नाही, याबाबत कृषी विभागाने सुक्ष्म नियोजन करावे. जास्तीत जास्त उगवण क्षमता असलेल्या घरगुती सोयाबीन बियाणांचा वापर करण्याचे शेतक-यांना आवाहन करा, अशा सुचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केल्या.

तपासणीसाठी जिल्ह्यात 16 भरारी पथके

खरीप हंगामासाठी जिल्ह्यात सोयाबीनचे 1 लाख 31 हजार 242 क्विंटल बियाणे, तूर 15008 क्विंटल बियाणे, ज्वारी 1065 क्विंटल, मुंग 770 क्विंटल, उडीद 760 क्विंटल बियाणांची तर कापूससाठी 25 लक्ष 59 हजार 256 पॅकेटची मागणी नोंदविण्यात आली आहे. जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात एक याप्रमाणे 16 भरारी पथकाची स्थापना तालुका कृषी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली आहे. तर एक जिल्हास्तरीय पथक निर्माण करण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details