यवतमाळ - केंद्र शासनाने लागू केलेले कृषी कायदे रद्द करावे, दिल्लीतील आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांसोबत संवाद साधून शंकेचे निरसन करण्यात यावे, अशी मागणाी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे. या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने 'सांग सांग भोलानाथ हा कायदे रद्द होईल का? असे साकडे घालत अभिनव आंदोलन करण्यात आले.
स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष याबाबत प्रतिक्रिया देताना. महादेवाला व नंदीबैलाला साकडे -
शेतकऱ्यांच्यावतीने पुकारलेल्या भारत बंदच्या आवाहनाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने यवतमाळ जिल्ह्यातून समर्थन देण्यात आले आहे. आंदोलनादरम्यान, महादेवाला व नंदीबैलाला साकडे घालून केंद्रशासनाने मंजूर केलेले हे कायदे शेतकरी हिताचे आहे अथवा नाही हे शेतकऱ्यांसमोर विचारलेल्या प्रश्नाला नंदीबैलाने स्पष्ट नकार दिला, असे सांगण्यात आले.
हेही वाचा -माझे नाव घेऊन शेतकरी आंदोलनाच्या विषयाला बगल देण्याचा प्रयत्न - शरद पवार
शेतकऱ्यांच्या मनातील संभ्रम दूर करावा -
कृषी कायद्याला शेतकऱ्यांनी प्रचंड विरोध केला आहे. यामुळे या कायद्याबाबत निर्माण झालेल्या संभ्रमाला दूर करून व या आंदोलनाला जातीय व धार्मिक प्रांतिक तेड असा संदर्भ देऊन केंद्र शासनाने शेतकर्यांच्या आंदोलनाला बदनाम करू नये, अशी मागणी यावेळी स्वाभिमानीच्यावतीने करण्यात आली.
कृषी कायद्याबाबत सकारात्मक विचार करावा -
या आंदोलनाच्या मागण्यासंदर्भात केंद्र शासनाने तातडीने सकारात्मक विचार करावा. देशातील शेतकऱ्यांना शेतमालाला आधारभूत किंमत, हमीभावाबाबत कायद्याने द्यावे आणि शेतकरी हिताचे निर्णय घ्यावे. तसेच या तिन्ही कायद्यांमध्ये शेतकऱ्यांच्या हिताची जपणूक व्हावी, अशी मागणी या आंदोलनातुन केंद्र शासनाकडे करण्यात आली आहे.