यवतमाळ - मागील महिन्यात आलेल्या परतीच्या पावसामुळे सोयाबीन, तूर, कापूस या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच, कपाशीवर बोंडअळीने आक्रमण केले आहे. यासंदर्भात शासनाने साधे पंचनामेसुद्धा केलेले नाही. त्यामुळे, शेतकऱ्यांना मदत मिळणे दुरापास्त झाले आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना तातडीने हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत मिळावी, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकरी आक्रोश मोर्चा काढण्यात आला.
शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची नुकसान भरपाई द्या, 'स्वाभिमानी'ची मागणी - Swabhimani Shetkari Sanghatana Morcha Yavatmal
संघटनेच्या वतीने उपविभागीय अधिकारी स्वप्नील कापडणीस यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. परतीच्या पावसाने सोयाबीन आणि कापूस पिकांचे मातेरे झाले आहे. तूर पिकाचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता आहे. शासनाच्या चुकीने अनेकांना कर्जमाफीपासून मुकावे लागले.
संघटनेच्या वतीने उपविभागीय अधिकारी स्वप्नील कापडणीस यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. परतीच्या पावसाने सोयाबीन आणि कापूस पिकांचे मातेरे झाले आहे. तूर पिकाचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता आहे. शासनाच्या चुकीने अनेकांना कर्जमाफीपासून मुकावे लागले. यामुळे शेतकऱ्यांना सरसकट मदत देण्यात यावी. तसेच, जे शेतकरी कर्जमुक्तीपासून वंचित राहिले त्यांना त्वरित कर्ज उपलब्ध करून द्यावे. कोरोना काळातील शेतकऱ्यांचे वीजबिल माफ करण्यात यावे, अशा अनेक मागण्या आंदोलकर्त्यांनी केल्या.
हेही वाचा-शासनाचा निषेध करीत शेतकऱ्याने पेटवून दिले पाच एकरातील सोयाबीन; महागाव तालुक्यातील घटना