यवतमाळ - यवतमाळ जिल्ह्यात मागील चार दिवसांपासून पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. जिल्ह्यातील यवतमाळ, पुसद, दिग्रस, दारव्हा आणि पांढरकवडा या तालुक्यातील मोठ्या प्रमाणात पॉझिटिव्ह रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे ज्या भागात पॉझिटिव्ह रुग्ण आढळत आहे. तो भाग प्रतिबंधित क्षेत्र करण्यात येत आहे. अशा प्रतिबंधित क्षेत्रामध्ये मोबाईल व्हॅनद्वारे नागरिकांचे स्वॅब घेण्याची मोहीम जिल्हा प्रशासनाच्या वतीने सुरू करण्यात आली.
यवतमाळ जिल्ह्यात प्रतिबंधीत क्षेत्रात मोबाईल व्हॅनद्वारे स्वॅबची तपासणी - corona update
वतमाळ जिल्ह्यात मागील चार दिवसांपासून पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे.
यवतमाळ जिल्ह्यात प्रतिबंधीत क्षेत्रात मोबाईल व्हॅनद्वारे स्वॅबची तपासणी
यवतमाळ जिल्ह्यामध्ये सात तालुक्यात 116 प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले आहेत. यामध्ये यवतमाळ 86, पुसद 11, दारव्हा 3, दिग्रस 12 आर्णी, एक बाभूळगाव 3 आणि पांढरकवडा 3 समावेश आहे.
दररोज तीनशेवर तपासण्या-
जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाच्या वतीने सकाळी आठ वाजतापासून मोबाईल व्हॅनद्वारे प्रतिबंधित क्षेत्रमध्ये जाऊन एका पॉझिटिव्ह रुग्ण मागे 20 नागरिकांचे स्वॅब घेण्यात येत आहेत. तसेच प्रतिबंधित चित्रांमध्ये नागरिकांनी बाहेर फिरू नये, असे आवाहन सुद्धा करण्यात आले आहे. त्याचबरोबर ज्या नागरिकांना सर्दी, ताप, खोकला, असे आजार आहेत. त्यांनी स्वतः पुढे येऊन आपली तपासणी करून घ्यावी, असे आवाहन सुद्धा जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी केले आहे.