महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

यवतमाळ : ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवारांनी विजयी झाल्याचे प्रमाणपत्र सादर करावे; प्रशासनाचे आदेश - ग्रामपंचायत निवडणुक

समितीकडे प्राप्त झालेल्या निवडणूक प्रकरणात समितीने निर्णय घेतला आहे. तसेच सदर त्रुटी ही संबंधीत अर्जदाराच्या अर्जात नमुद ई-मेलवर व भ्रमणध्वनी क्रमांकावर लघुसंदेशाद्वारे कळविण्यात आलेली आहे. सदर आक्षेपाची पुर्तता ही https://barti.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर करावी, असे निर्देश प्रशासनाकडून देण्यात आले आहे.

विजयी झाल्याचे प्रमाणपत्र सादर करावे
विजयी झाल्याचे प्रमाणपत्र सादर करावे

By

Published : May 10, 2021, 7:56 PM IST

यवतमाळ -जानेवारी 2021 मध्ये पार पडलेल्या सार्वजनिक ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या उमेदवारांना उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, जात वैधता प्रमाणपत्रे विहीत मुदतीत निर्गमीत करणे समितीस बंधनकारक आहे. त्यामुळे राखीव जागेवर निवडून आलेल्या विजयी उमेदवारांनी प्रकरणे प्राधान्याने निकाली काढण्याकरीता जात पडताळणी समिती कार्यालयाकडे निवडून आल्याचे प्रमाणपत्र व अर्ज सादर केलेल्या पावतीची छायांकित प्रत 31 मे 2021 पर्यंत कार्यालयाच्या पत्यावर पोस्टाने किंवा cvc.yavatmal@gmail.com या ई-मेलवर पाठवावन्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने काढले आहे.

'या संकेतस्थळावरच कागदपत्राची पुर्तता करावी'

समितीकडे प्राप्त झालेल्या निवडणूक प्रकरणात समितीने निर्णय घेतला आहे. तसेच सदर त्रुटी ही संबंधीत अर्जदाराच्या अर्जात नमुद ई-मेलवर व भ्रमणध्वनी क्रमांकावर लघुसंदेशाद्वारे कळविण्यात आलेली आहे. सदर आक्षेपाची पुर्तता ही https://barti.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर करावी, असे निर्देश प्रशासनाकडून देण्यात आले आहे.

हेही वाचा -मराठा समाज आक्रमक; सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची बीडमध्ये केली होळी

ABOUT THE AUTHOR

...view details