यवतमाळ - पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात वनमंत्री संजय राठोड यांचे नाव जोडून त्यांची बदनामी सुरू आहे. ही बदनामी थांबविण्याबाबत महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून दिग्रस तहसीलदारांच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन पाठवण्यात आले.
विरोधीपक्षाकडून केवळ राजकारण -
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात कोणतीही चौकशी न होता वनमंत्री संजय राठोड यांची बदनामी करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे राठोड यांना सरळ दोषी सिद्ध करून त्यांचे सामाजिक, राजकीय व कौटुंबिक जीवन उद्धवस्त होत आहे. तसेच राज्यातील विरोधीपक्ष या मुद्याचे राजकारण करून समाजाची दिशाभूल करत आहे. तपासाअंती दोषींवर कार्यवाही व्हावी, अशी मागणी यावेळी शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी या महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केली आहे.