यवतमाळ -प्रहार जनशक्ती पक्षाच्या विधानसभा प्रमुखाने शहरात सौंदर्यीकरणासाठी लावलेल्या योगमुद्रेतील मूर्तीची तोडफोड केली. पोस्ट ऑफिस चौकात योगाभ्यासाचा संदेश देण्यासाठी या मूर्तीची निर्मिती करण्यात आली होती. बिपीन चौधरी, असे मूर्तीची तोडफोड करणाऱ्या कार्यकर्त्याचे नाव आहे.
यवतमाळमध्ये प्रहार संघटनेकडून योगमुद्रेतील मूर्तीची तोडफोड, २६ जूनपर्यंत शाहू महाराजांचा पुतळा बसवण्याची मागणी - बिपीन चौधरी
प्रहार पक्षाचे विधानसभा प्रमुख आणि शाहू महाराज पुतळा समितीने पोस्ट ऑफिस चौकात शाहू महाराजांचा पुतळा हवा, अशी भूमिका घेत योग मुद्रेची मूर्ती दगडफेक करून विद्रुप केली.
प्रहार पक्षाचे विधानसभा प्रमुख आणि शाहू महाराज पुतळा समितीने पोस्ट ऑफिस चौकात शाहू महाराजांचा पुतळा हवा, अशी भूमिका घेत योग मुद्रेची मूर्ती दगडफेक करून विद्रुप केली. याठिकाणी शाहू महाराजांची प्रतिमा आहे. मात्र, त्यापुढे योग मुद्रेतील मूर्ती उभारण्यात आल्यामुळे उद्घाटन होण्यापूर्वीच तीची नासधूस करण्याचा प्रयत्न प्रहार पक्षाचे विधानसभा प्रमुख चौधरी आणि शाहू महाराज पुतळा समितीच्या सदस्यांनी केला. यामुळे शहर सौंदर्यीकरणाच्या कामात खीळ बसली आहे.
दरम्यान, २६ जूनपर्यंत शाहू महाराजांचा पुतळा न बसविल्यास तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशाराही यावेळी या आंदोलनकर्त्यांनी दिला.