यवतमाळ - उमरखेड येथील दहागावातील पुलावरून हिरकणी एसटी बस (एमएच १४ बीटी ५०१८) पाण्यात वाहून गेली आहे. पुलावरून पाणी जात असताना चालकाला रस्त्याचा अंदाज न आल्याने हा अपघात झाला. बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना गावकऱ्याच्या मदतीने बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. या अपघातात तब्बल आठ तासानंतर दोन जणांचे मृतदेह सापडले आहेत. तर आणखी 1 जण बेपत्ता आहे. या अपघातातील एकूण मृतांची संख्या 3वर पोहोचली आहे. तर 2 जणांना वाचविण्यात यश आले होते. अजूनही बचावकार्य सुरूच आहे. एका एसटी बस कर्मचाऱ्यांचा मृत्यूदेह उशिरा मिळाला. मात्र, तो चालक की, वाहक हे समजले नाही. घटनास्थळी तहसीलदार आनंद देऊळगावकर, ठाणेदार अमोल माळवे यांनी ताबडतोब घटनास्थळी जाऊन शोधकार्य सुरू केले. आता चार जणांपैकी एक एसटी कर्मचारी आणि एक प्रवाशी बेपत्ता आहेत.
या बसमध्ये 4 प्रवाशी आणि चालक व वाहक असे 6 प्रवासी प्रवास करत होते. नांदेड-नागपूर ही बस असून नांदेडवरून नागपूरला पुसद मार्गे जात होती.
प्रवासी तेलंगणा आणि पुसद येथील -