यवतमाळ - लॉकडाउनच्या काळात मोठ्या प्रमाणात कामगार, विद्यार्थी, नागरिकांचे शहरी भागातून ग्रामीण भागात स्थलांतर झाले आहे. त्यामुळे कोरोना विषाणूचा संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. आलेल्या संकटावर मात करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ग्रामीण स्तरावर 'कोवीड केअर सेंटर' सुरू करण्याबाबत नियोजन करावे, असे निर्देश जिल्हा परिषद अध्यक्ष कालिंदा पवार यांनी सर्व गटविकास अधिकार्यांना दिले आहेत. जिल्हा परिषद अध्यक्ष पवार यांनी गटविकास अधिकार्यांसोबत भ्रमणध्वनीद्वारे संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध बाबींचा आढावा घेतला.
'प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत 'कोवीड केअर सेंटर’चे नियोजन करावे' - zp president kalinda pawar latest news
कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ग्रामीण स्तरावर 'कोवीड केअर सेंटर' सुरू करण्याबाबत नियोजन करावे, असे निर्देश जिल्हा परिषद अध्यक्ष कालिंदा पवार यांनी सर्व गटविकास अधिकार्यांना दिले आहेत. कोरोना विषयक सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. ते जबाबदारीपूर्वक करण्यात यावे, कोणत्याही व्यक्तीस लक्षणे आढळल्यास त्यांना जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्र अथवा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात यावे, आदी सूचनाही अध्यक्ष पवार यांनी दिल्या.
कोरोना विषाणूबाबत परिस्थिती ग्रामीण भागात समाधानकारक आहे. नागरिक प्रशासनाला सहकार्य करत असल्याचे सांगण्यात आले. आता 30 एप्रिलपर्यंत लॉकडाउन वाढविण्यात आले आहे. हा निर्णय कोरोना विषाणूला हद्दपार करण्यासाठी हिताचा आहे. कर्मचार्यांना नेमून दिलेले काम जनहित आणि राष्ट्रहित समजून पार पाडावेत. गावागावात धूळफवारणी, रासायनिक फवारणी करावी, गावातील परिसर स्वच्छ ठेवावा, अनावश्यक गर्दी टाळावी, काही भागात पाणीटंचाई निर्माण झाली आहे आणि भविष्यात ही तीव्र होऊ शकते. गावांचा पाणीटंचाईबाबात आढावा घेऊन त्यावर तत्काळ उपाययोजना करावी, कोरोना विषयक सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. ते जबाबदारीपूर्वक करण्यात यावे, कोणत्याही व्यक्तीस लक्षणे आढळल्यास त्यांना जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्र अथवा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात यावे, आदी सूचना अध्यक्ष पवार यांनी गटविकास अधिकार्यांना दिल्या आहेत.
हेही वाचा -कराड-पाटणमधील चौघांची टेस्ट 'पॉझिटिव्ह'; दहा महिन्यांच्या बाळाला लागण