यवतमाळ - कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने यवतमाळ शहरासह पांढरकवडा, पुसद, दिग्रस, दारव्हा आणि नेर या तालुक्यांमध्ये 25 जुलै ते 31 जुलैपर्यंत लॉकडॉउनचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आठवडाभर घराबाहेर पडता येणार नाही. त्यामुळे जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी नागरिकांनी बाजारपेठेत गर्दी केली. आज सकाळी दहा वाजतापासून बाजारपेठेत ग्राहकांची गर्दी उसळली. कुठेही नियमांचे पालन करण्यात आले नाही. यावेळी सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडाल्याचे चित्र संपूर्ण शहरात पाहायला मिळाले.
यवतमाळमध्ये २५ ते ३१ जुलैपर्यंत लॉकडाऊन, जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांची गर्दी - यवतमाळ लॉकडाऊन न्यूज
बाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहेत. शहरी भागापुरता मर्यादित असलेला कोरोना विषाणू ग्रामीण भागात आपले पाय पसरत आहे. यवतमाळ शहरातही कोरोनाबाधित रुग्ण झपाट्याने आढळून येत आहे. पहिल्या टप्प्यातील लॉकडाऊननंतर बाजारपेठेत खरेदीसाठी ग्राहकांना ठराविक वेळेत खरेदीची मुभा देण्यात आली होती. त्यावेळेस बाजारपेठेत गर्दी उसळत असल्याने जिल्हा प्रशासनाने आठवडाभर लॉकडॉऊनचा निर्णय घेतला.
बाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहेत. शहरी भागापुरता मर्यादित असलेला कोरोना विषाणू ग्रामीण भागात आपले पाय पसरत आहे. यवतमाळ शहरातही कोरोनाबाधित रुग्ण झपाट्याने आढळून येत आहे. पहिल्या टप्प्यातील लॉकडाऊननंतर बाजारपेठेत खरेदीसाठी ग्राहकांना ठराविक वेळेत खरेदीची मुभा देण्यात आली होती. त्यावेळेस बाजारपेठेत गर्दी उसळत असल्याने जिल्हा प्रशासनाने आठवडाभर लॉकडॉऊनचा निर्णय घेतला. ग्राहकांची असुविधा टाळण्यासाठी शुक्रवारी सकाळी दहा ते दुपारी पाच वाजेपर्यंत बाजारपेठ सुरू ठेवण्यात आली. जणूकाही आजचाच दिवस हा अखेरचा आहे, असे समजून नागरिकांनी जीवनावश्यक वस्तू, साहित्य खरेदीसाठी बाजारपेठेत एकच गर्दी केली. मात्र, यावेळी कुठेही सोशल डिस्टंसिंगचे पालन करण्यात आले नाही.
किराणा दुकान, पेट्रोल पंप, भाजीपाला, कपडा मार्केट आदी प्रमुख दुकानात खरेदीसाठी ग्राहकांच्या रांगा लागल्या होत्या. मात्र, यावेळी वाहतूक शाखेकडून कोणत्याही प्रकारची उपाययोजना करण्यात आली नाही. गर्दीच्या ठिकाणी बॅरिकेट्स लावण्यात आले नसल्याने रस्त्यावर वाहनांची मोठी कोंडी झाली होती. महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात लॉकडाऊन लागत असल्याने या कालावधीत अनेकांच्या घरातील किराणा संपलेला आहेत. पुढील साहित्य मिळणार की नाही, या भीतीने नागरिकांनी बाजारपेठ गाठली. मात्र, ग्राहकांनी खरेदीवेळी कुठल्या नियमांचे पालन केले नाही. नागरिकांनी नियमांचे पालन, सोशल डिस्टंसिंग, मास्क वापरणे आदी नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले. नियमांचे पालन केले तरच जिल्हा कोरोनामुक्त होईल, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.