महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

यवतमाळात सहा कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु;61 जणांची कोरोनावर मात

जिल्ह्यात सद्यस्थितीत कोरोनाचे 502 सक्रिय रुग्ण आहेत. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 9 हजार 464 झाली आहे.

By

Published : Oct 19, 2020, 3:25 AM IST

सरकारी रुग्णालय
सरकारी रुग्णालय

यवतमाळ : जिल्ह्यात सहा कोरोनाबाधित रुग्णांचा रविवारी मृत्यू झाला. तर नवीन ९० रुग्ण कोरोनाबाधित असल्याचे आढळले आहे. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विलगीकरण कक्ष तसेच इतर रुग्णालयातील 61 जणांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.

कोरोनाने मृत्यू झालेल्यामध्ये शहरातील 68, 85 आणि 89 वर्षीय पुरुष, दिग्रस येथील 50 वर्षीय तर पुसद येथील 90 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. तर नांदेड जिल्ह्यातील 65 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार रविवारी एकूण 619 जणांचे कोरोनाचे अहवाल प्राप्त झाले. यापैकी 90 नव्याने पॉझेटिव्ह तर 529 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.

जिल्ह्यात सद्यस्थितीत कोरोनाचे 502 सक्रिय रुग्ण आहेत. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 9 हजार 464 झाली आहे. कोरोनातून बरे झालेल्यांची एकूण संख्या 8 हजार 505 आहे. तर जिल्ह्यात कोरोनाने 303 जणांचा मृत्यू झाला .

जिल्ह्यात आजतागायत 85 हजार 164 जणांचे नमुने कोरोना चाचणीसाठी पाठविण्यात आले. यापैकी 84 हजार 474 जणांचो कोरोना अहवाल प्राप्त झाले आहेत. अद्याप 690 जणांचे अहवाल अप्राप्त आहेत. तर 75 हजार 10 नागरिकांचे नमुने निगेटिव्ह आले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details