यवतमाळ -राज्यात महाविकास आघाडी आहेत. मात्र, जिल्ह्यात शिवसेनेकडून या महाविकास आघाडीचा धर्म पाळला जात नाही. शिवसेनेकडून काँग्रेसला सापत्न वागणूक देण्यात येते. जिल्ह्यात काँग्रेसचे प्राबल्य असलेल्या मतदारसंघात सेनेचा एकच आमदार असताना सेना मोठ्या प्रमाणात तिथे लुडबूड करते. जिल्हा स्तरावर असलेल्या विविध समित्यांवर सेनेचे पदाधिकारी घेतल्या जातात अशी तक्रार यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे यांनी मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे केली केली. माणिकराव ठाकरेच्या वक्तव्याने जिल्ह्यात महाविकास आघाडीत आलबेल नसल्याचे चित्र पुन्हा स्पष्ट झाले आहे.
शिवसेना महाविकास आघाडीचा धर्म पाळत नाही - माणिकराव ठाकरे - महाविकास आघाडी
महाविकास आघाडी मधील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना या तीन पक्षाच्या जिल्हाप्रमुख यांनी एकत्र बसून कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकून घ्यायला हवे. शेवटी कार्यकर्त्यांवरच पक्ष मोठा होत असतो. अशा वेळी मुख्यमंत्री शिवसेनेचा असल्याने शिवसेनेने काँग्रेसला सापत्न वागणूक देणे योग्य नाही, असेही मत जिल्ह्याचे संपर्कमंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे माणिकराव ठाकरे यांनी व्यक्त केले.
माणिकराव ठाकरे